Monday, August 10, 2015

My Articles


२०१५ - मोदी सरकारची संकल्पित आिर्थक नीती 
२०१६ ची अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक आिण हिलरी क्लिंटन
मूलभूत आर्थिक बदलांचे वर्ष - २०१५ 
भारतीय अर्थव्यवस्था कूस बदलेल 
आर्थिकक्षेत्रातील चीनची घसरगुंडी 
इस्लाममधील बदलाचे वारे
इस्लाममध्ये उत्पन्न झालेले बदलाचे वारे
एका हिंदूस पत्र’ लिहिणारा लिओ टॉलस्टाय 
चार्ल्स डिकन्सची अपूर्ण कादंबरी आिण स्पर्धा
कोणत्या वर्गात केव्हा प्रवेश
खबरे व्हा, खबरे
शंभर वर्षानंतरही गांधी तेवढेच प्रासंगिक 
गीतेतील १९ वा अध्याय 
गीतेतील अध्याय : विमानपर्व
गोड साखरेचीकडू कोडी 
गोपाळ कृष्ण गोखले
चर्चिल उवाच!
चर्चिल उवाच!
कलाविष्काराला कारुण्याची किनार 
जागतिक मंदी आिण भारत
जागतिक राजकीय सारीपटावर होऊ घातलेले बदल 
जॅान नॅशचा अपघाती मृत्यू
जेफ्री आर्चर- आजचा एक आघाडीचा साहित्यि
टाइम मशीन
वाजिब-उल-कत्ल' - ठार मारण्यास योग्य
तीन पालक
ते आपल्या चौपट आहेत
 नीती आयोग
नीती आयोगाचे वेगळेपण 
मुस्लिम अितरेक्यांचे पंचक
व्यर्थ न गेलेले बलिदान
हिंदू ख्रिश्चन संवाद केव्हा होऊ शकेल 
साखर कडू का झाली 
एक होता राजा,एक आहे राजा आिण एक होणार राजा
 HISTORY OF HINDU-
CHRISTIAN ENCOUNTERS
 हिंदू-ख्रिश्चन, संपर्क , संधर्ष आिण संवाद.

हिंदू - ख्रिश्चन संवाद केव्हा होऊ शकेल

२०१६ ची अमेरिके ची अध्यक्षीय निवडणूक आिण हिलरी क्लिंटन



My Articles


२०१५ - मोदी सरकारची संकल्पित आर्थिक नीती 

२०१६ ची अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक व हिलरी क्लिंटन
मूलभूत आर्थिक बदलांचे वर्ष - २०१५ 
भारतीय अर्थव्यवस्था कूस बदलेल 
आर्थिकक्षेत्रातील चीनची घसरगुंडी 
इस्लाममधील बदलाचे वारे
इस्लाममध्ये उत्पन्न झालेले बदलाचे वारे
एका हिंदूस पत्रलिहिणारा लिओ टॉलस्टाय 
चार्ल्स डिकन्सची अपूर्ण कादंबरी  व स्पर्धा
कोणत्या वर्गात केव्हा प्रवेश? 
खबरे व्हा, खबरे
शंभर वर्षानंतरही गांधी तेवढेच प्रासंगिक 
गीतेतील १९ वा अध्याय 
गीतेतील अध्याय विमानपर्व
गोड साखरेची कडू कोडी 
गोपाळ कृष्ण गोखले
चर्चिल उवाच!
चर्चिल उवाच!
कलाविष्काराला कारुण्याची किनार 
जागतिक मंदी व भारत
जागतिक राजकीय सारीपटावर होऊ घातलेले बदल 
जॅान नॅशचा अपघाती मृत्यू
जेफ्री आर्चर- आजचा एक आघाडीचा साहित्यिक
टाइम मशीन   
वाजिब-उल-कत्ल' - ठार मारण्यास योग्य ! 
तीन पालक
ते आपल्या चौपट आहेत
 नीती आयोग
नीती आयोगाचे वेगळेपण 
मुस्लिम अतिरेक्यांचे पंचक
साखर कडू का झाली 
एक होता राजा,एक आहे राजा  एक होणार राजा
 HISTORY OF HINDUCHRISTIAN ENCOUNTERS
 हिंदू-ख्रिश्चन, संपर्क संर्ष व संवाद.
हिंदू - ख्रिश्चन संवाद केव्हा होऊ शकेल
२०१६ ची अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक व हिलरी क्लिंटन
मोदींची मुलाखत 
पहिली भारतीय महिला डॅाक्टर 
फाशीनंतरची चौकशी 
असाही एक सलमान खान 
अमर्त्यांच्या मर्त्य कथा 
शिंपला भेदणारा मोती 
मोदींच्या या भेटीचे वेगळे पण कोणते? 
भारत व अफगाणिस्थान संबंध जुने व नवीन 
वाचा, विचार करा, योग्य वाटल्यास इतरांना सावध करा 
मतदानाची सक्ती असावी की नसावी? 
देवमाशाच्या(व्हेलनगरी जाऊन 
अमेरिकेतील ओसाडवाडी - सेंट्रालिया ! 
पहिली भारतीय महिला डॅाक्टर 
पुत्र सिंधूचे  व गंगेचे
का बरे बुडाली श्रीकृष्णाची द्वारका?
 जळीस्थळीकाष्ठीपाषाणीभगवेकरण का दिसते?
चांगले प्रशासन केव्हा व कसे मिळेल?
पत्रकारितेतील महामेरू - बेंजामिन ब्रॅडली
जॅान नॅशचा अपघाती मृत्यू 
पनामा सुवेझ कालवे व गंगावतरण 
द रेड सारी - लाल साडी 
तिरेक्यांचे लक्ष्य - शिक्षणसंस्था
मध्यपूर्वेतील सुंदोपसुंदी व बगदादीची दिव्य शक्ती(?) 
मध्यपूर्वेतील सुंदोपसुंदी व बगदादीची दिव्य शक्ती(?) २
आयफेल टॅावर विकणे आहे?
म्हणून आयफेल टॉवर आज  दिमाखात उभा आहे. 
उडदामधले काळे गोरे 
बचा पोष'-अफगाण स्त्रीचे अल्पजीवी स्वातंत्र्य 
गीता, कौटिल्य व हेन्री किसिंजर 
 दिल्लीच्या निवडणुकीचे  विश्लेषण
श्री. लक्ष्मणराव जोशी व शिक्षक परिषद 
जेईई-मेन परीक्षा
अफगाणिस्थानच्या अदिल शहाचे पलायन 
राष्ट्रपती व अध्यादेश 
राष्ट्रपती व अध्यादेश 
चीनची चतुर चाल व पंतप्रधानांचे चोख व चपखल प्रत्युत्तर 
आंधळी धर्मनिष्ठा व  शिक्षण 
९ जानेवारी १९१५ ला भारतात झालेले गांधीचे पदापर्ण 
प्रवेशासाठीच्या स्पर्धा परीक्षा 
इंटेल इंटरनॅशनल सायन्स अँड इंजिनिअिरंग फेअर 2015 
ज्ञानेश्वर विद्यापीठ 
खूप पास तरीही नापास का?
मूलभूत अर्थ बदलांचे वर्ष- २०१५ 
मूलभूत अर्थ बदलांचे वर्ष - २०१५ 
फ्युचर शॅाक’ -२
फ्युचर शॅाक’ 
Why Modi made a sensible PM ... 
इराणशी झालेला करार कुणाला कसा वाटतो
इसीसच्या शक्ती व मर्यादा
२०१६ नंतर अमेरिकेची भूमिका कोणती असेल ?
Best Wishes  
Why are teachers agitating
Sacrifice not in vain
Tolstoy
Five Terorists
Bradly
Bagadadi
लोकशाहीचा चौथा स्तंभ 
नॉट विदाउट  माय डॉटर
They are four times bigger than us
Fit to kill
Josef Nai - Alternate Power
Gopal Krishna Gokhale
Gandhi Relevant Even Today





Thursday, June 4, 2015

पनामा, व सुवेझ कालवे आणि गंगावतरण

पनामा, व सुवेझ कालवे आणि गंगावतरण
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया

पनामा कालवा १५ ऑगस्ट २०१४ ला शंभर वर्षांचा झाला.  पण जगातला दोन समुद्रांना- भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र (रेड सी)- जोडणारा पहिला मानवनिर्मित सुवेज कालवा त्याच्यापेक्षा कितीतरी जुना आहे. इसवी सनापूर्वी १८७४ साली (नक्की सांगायचे तर ३८८८ वर्षांपूर्वी) इजिप्तचा राजा सेनौसार्त (तिसरा) याने हा कालवा खणण्याचा प्रयत्न केल्याचे इतिहास सांगतो. पण गाळ साचत गेल्यामुळे हा प्रयत्न सोडून द्यावा लागला. नंतर अनेक प्रयत्न झाले. नेपोलियनने सुद्धा हा कालवा खणण्याचा प्रयत्न केला होता. पण भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र (रेड सी) यांच्या पातळीची उंची मोजण्यातचूक झाली म्हणून  म्हणा किंवा अशीच काहीतरी चूक होऊन त्याने हा विचार सोडून दिला. नौकानयनासाठी या कालव्याचा उपयोग व्हायला १८६९ हे साल उजाडावे लागले. या सालच्या १७ नोव्हेंबरला पहिली नौका या कालव्यातून पार करून एका समुद्रातून दुसऱ्या समुद्रात-भूमध्य समुद्रातून लाल समुद्रात-गेली. या कालव्याचा फायदा असा झाला की, आफ्रिकेला वळसा घालणे वाचले. यामुळे पैसा आणि वेळ वाचला आणि  व्यापाराला आणि प्रवासाला चालना मिळाली. ब्रिटन व फ्रान्स या देशातील कंपनीचे या कालव्यावर नियंत्रण होते. इजिप्तमध्ये क्रांती होऊन नासर सत्ताधीश झाला. त्याला सहाजिकच कालव्यावर आपले स्वामित्व असावे, असे वाटत होते.
सुवेझवर स्वामित्व मिळावे म्हणून संघर्ष
ब्रिटन, फ्रान्स आणि इस्राईल विरुद्ध इजिप्तचा अध्यक्ष नासर यांच्यात १९५६ मध्ये या कालव्याच्या प्रश्नावरून निर्माण झालेले वितुष्ट विकोपाला गेले. आपला सुवेझ कालव्यावर ताबा कायम रहावा असा ब्रिटन आणि फ्रान्सचा मनोदय होता. पण नासरने कालव्याचे राष्ट्रीयीकरण करून कालवा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. वादाच्या ठिणगीचे रुपांतर युद्धात झाले. नासरने कालव्यात बोटी बुडवून तो निरुपयोगी करण्याचा प्रयत्न केला. अमेरिका, रशिया आणि युनो यांनी आपले सगळे कौशल्य पणाला लावून युद्धविराम घडवून आणला. पण नासारला पदच्युत करून कालवा आपल्या ताब्यात ठेवणे ब्रिटन, फ्रान्सला शक्य झाले नाही. दुसऱ्या महायुद्धानंतरच ब्रिटनच्या प्रतिष्ठेला ओहटी लागली होती. या युद्धानंतर   ब्रिटनची गणना महाशक्तींमध्ये होईनाशी झाली. पुढे निरनिराळ्या निमित्ताने हा कालवा तब्बल पाच वेळा बंद झाला. शेवटी १९७५ सालच्या नोव्हेंबरमध्ये तो वाहतुकीसाठी खुला झाला तो निदान आजपर्यंत तरी सुरु आहे.
उत्तर आणि दक्षिण अमेरिका वेगळे करणारा पनामा
पनामा कालवा आता चांगलाच रुंद होत असून हा रुंद कालवा १५ ऑगस्टला शंभर वर्षांचा होऊन वाहतुकीसाठी खुला होतो आहे. कालवा रुंद करण्याचा हा प्रयत्न जगातील सर्वात मोठा आणि खर्चिक स्वरूपाचा पायाभूत सोयी सवलतीचा विकास करण्याचा प्रयत्न मानला जातो आहे. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारी अरुंद पट्टी खोदून हा कालवा तयार केला  आहे. वाळूच्या घड्याळातील काचेच्या दोन अर्धगोलाकार पात्रांना जोडणारी जशी एक अरुंद नलिका असते, तसा भूभाग पनामा देशात कालवा तयार होण्यापूर्वी होता. पहिला अर्धगोल म्हणजे उत्तर अमेरिका आणि दुसरा अर्धगोल म्हणजे दक्षिण अमेरिका आणि यांना जोडणारी चिंचोळी पट्टी म्हणजे पनामा देश. असाच निमुळतेपणा ग्वाटेमाला, निकाराग्वा, होन्डुरास या सारख्या अशाच चिंचोळ्या भूभागातही आहे. पण सर्वात निमुळती ८० किलोमीटरची पट्टी पनामा देशात आहे. एका बाजूला आहे अटलांटिक महासागर (या भागात त्याला ‘कॅरेबियन सी’ असे म्हणतात) तर दुसऱ्या बाजूला आहे पासिफिक महासागर. या कालव्यामुळे दक्षिण अमेरिकेला वळसा घालण्याचा हजारो किलोमीटरचा जलप्रवास वाचला आणि पैसा आणि वेळेचीही बचत झाली.
कौशल्य, प्रयत्न आणि जिद्द यांची दोन मूर्तीमंत उदाहरणे
पनामा आणि सुवेझ हे दोन्ही कालवे मानवाच्या तंत्रज्ञानविषयक कौशल्याची, भगीरथ प्रयत्नांची, जिद्दीची साक्ष देणारे आहेत. पनामा १९१४ साली वाहतुकीला खुला झाला असला तरी ही कल्पना १५२९ सालापासून लोकांच्या मनात होती. या दृष्टीने विविध सूचना समोर येऊ लागल्या होत्या. शेवटी पनामा राज्यातून हा कालवा काढणे सोयीचे ठरेल, असे नक्की झाले.  कालवा खणण्याचे काम करणाऱ्या  कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कालवा खणात असतांना एकूण वीस हजार कामगारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा कालवा खणण्यासाठी ८ वर्षे लागतील, असा प्राथमिक अंदाज होता, पण तो चुकला. काठाचे खडक खचणार नाहीत, अशी समजूत होती. पण प्रत्यक्षात नेमका उलट अनुभव आला. इतरही अनेक समस्या उद्भभवल्या या समस्यांचे स्वरूप राजकीय, आर्थिक, आणि तांत्रिक असे त्रिविध होते. शेवटी सर्व अडचणींवर मात करून हा कळवा एकदाचा तयार झाला. हे दोन्ही कालवे जगाच्या अर्थकारणावर तसेच आधुनिक जगाच्या इतिहासावर फार मोठा परिणाम करणारे ठरले. पैसा आणि जलप्रवासासाठी लागणारा वेळ वाचवण्याचे फार मोठे काम या दोन्ही कालव्यांनी साध्य केले आहे.
पनामाचे वेगळे स्वरूप
पनामा कालवा पार करायला आठ ते दहा तास लागतात. याच्या शेजारूनच चाग्रेस नावाची महाकाय नदी वाहते. या नदीवर धरण बांधून एक भले मोठे सरोवर बांधले आहे. याची सरोवराची उंची अटलांटिक महासागरपेक्षा (कॅरेबिअन सी) २६ मीटर जास्त आहे. या सरोवरातील पाणी कालव्यात सोडून किंवा त्यातून पाणी काढून कालव्याची पातळी कमी अधिक उंच करता येते. ही एक क्लिष्ट क्रिया असून तिला ‘लॉक तयार करणे’असे म्हणतात. अशाप्रकारे  पाणी सोडून कालव्याची उंची वाढवतात किंवा कमी करून तो सखल करतात. हा सगळा खटाटोप करावा लागतो याचे कारण असे आहे की, पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागरापेक्षा खालच्या पातळीवर आहे. त्यामुळे अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जाणाऱ्या जहाजाला क्रमाक्रमाने उतरवत उतरवत हलकेच पॅसिफिक महासागरात त्याच्या उंचीवर आणून सोडावे लागते तर उलट पॅसिफिक महासागरातून अटलांटिक महासागरात जाणाऱ्या जहाजांना उलट क्रमाने हळूहळू वर चढवावे लागते आणि मग अटलांटिक महासागरात अलगद सोडावे लागते. सुवेझ कालवा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्राला जोडतो. पण या दोन समुद्रांच्या पातळीत फारसा फरक नाही. त्यामुळे हा कालवा पार करतांना असा खटाटोप करावा लागत नाही.
मालकी कुणाची?
पनामा कालवा अमेरिकेने बांधून पूर्ण केला. हा कालवा आपल्या देशातून जातो म्हणून या कालव्यावर पनामा देशाने आपला अधिकार सांगितला तेव्हा अमेरिकेने ही मागणी साफ धुडकावून लावली आणि लष्करी सामर्थ्याच्या भरवशावर हा कालवा आपल्या ताब्यात ठेवला. हा सरळसरळ दंडेलीचाच प्रकार म्हटला पाहिजे. पण इजिप्तच्या नासरच्या तुलनेत पनामामधील राजवटी अमेरिकेच्या तुलनेत पासंगालाही पुरणाऱ्या नव्हत्या त्यामुळे नासरप्रमाणे पानामाकडे या कालव्याचा ताबा शक्तीच्या भरवशावर येऊ शकला नाही. शेवटी लाजेखाजेस्तव अमेरिकेने पनामा देशच ताब्यात घेऊन तिथे आपले प्यादे सत्तेवर बसवले आणि आता एक कंपनी स्थापन करून तिच्या हाती कालव्याचे व्यवस्थापन सोपवले. या कालव्यातून आजवर दहा लाख जहाजे एका महासागरातून दुसऱ्या  महासागरात गेली आहेत.
गंगावतरणाचे वेगळे स्वरूप
जगातील दोन महासागारांना जोडणारे हे कालवे म्हणजे मानवाच्या कौशल्याचे, जिद्दीचे परिश्रमाचे प्रतीक स्वरूप आहेत यात शंका नाही. निसर्गाने या महासागरांना भूमीची पाचार ठोकून  वेगळे ठेवले होते. मानवाने ही पाचार खणून काढली आणि  महासागर जोडले. हा या विश्वातला एक विक्रमच आहे. पण तो रक्तलांच्छित आहे. भगवान शंकराने असे काही होऊ दिले नाही. भगिरथाच्या महाप्रयासाने आणि तपस्येने गंगावतरण झाले तेव्हा शंकराने तिला आपल्या मस्तकी धारण करून प्रलय होऊ दिला नाही. गंगा त्याच्या जटातून वाहत भूमीवर अलगद उतरली. मानवाला किंचितही त्रास होऊ न देता गंगा जीवनदायिनी ठरली. भारतीय आणि पाश्चात्य विचारसरणीतील फरक तर या उदाहरणांवरून अधोरेखित होत नाहीना?